मदभांवीजवळ कारवाई, युवकाला अटक
प्रतिनिधी /बेळगाव
मदभांवी – कुंभारगुत्ती जवळ अथणी पोलिसांनी बुधवारी एका युवकाला अटक करुन 18 किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत पावणे तीन लाख रुपयांइतकी होते. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली आहे.
कऱ्याप्पा श्रीपण्णा ऐनापुरे उर्फ देवकते (वय 40, मुळचा रा. हनमापूर, सध्या रा. मदभांवी-कुंभारगुत्ती) असे त्याचे नाव आहे. अथणीचे पोलीस उपअधिक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, पोलीस उपनिरीक्षक कुमार हाडकार, हवालदार ए. ए. इरकर, के. बी. शिरगूर, एस. जी. मन्नापूर आदींनी ही कारवाई केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कऱ्याप्पाने आपल्या शेत जमीनीत गांजा लागवड केली होती. गांजाची झाडे मोठी झाल्यानंतर त्याने ते काढुन आपल्या घरासमोर वाळण्यासाठी ठेवले होते. नंतर त्याची विक्री करण्यात येणार होती. यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून 18 किलो गांजासह कऱयाप्पाला अटक केली आहे. यासंबंधी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(ए)(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









