वार्ताहर/ अथणी
शहरातील अनंतपूर मार्गावरील बसवेश्वर चौकात टिप्परने दिलेल्या धडकेत मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. या अपघातात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सागर परशराम मादर (वय 20, रा. कृष्णा कित्तूर, ता. कागवाड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी बसवेश्वर चौकात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये टिप्परने दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये सागर हा टिप्परच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. तर इरशाद सय्यद सनदी (वय 20, रा. किरणगी) व लखन गणपती मादर (वय 21, रा. ऐगळी) हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मिरज येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अथणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.









