केएलई इस्पितळातील वैद्यकीय पथकाची कामगिरी : एनजीओग्राफीच्या माध्यमातून तपासणी केल्याने झाले निदान
प्रतिनिधी / बेळगाव
कोतळी (ता. चिकोडी) येथील एका 67 वषीय वृद्धावर येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त शॉकवेल लिथोट्रीप्सी प्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करुन त्या वृद्धाचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
कोथळी येथील वृद्धाला छातीत त्रास होत होता. त्यामुळे त्याला केएलई इस्पितळात दाखल केले होते. तातडीने एनजीओग्राफीच्या माध्यमातून त्याची तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांत कॅलशियम साचल्यामुळे रक्तपुरवठा कमी होवून त्याच्या जीवाला धोका असल्याचे आढळले.
उ. कर्नाटकात प्रथमच बेळगाव येथे हे उपचार केले. रक्तवाहिन्यांत कॅलशियम साचल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नव्हता. यापूर्वी वृद्धाला सरळ बसविण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जीव वाचविण्यासाठी हृदय शस्त्रक्रिया करण्याचा एकच पर्याय होता. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपचारपद्धतीमुळे या वृद्धाचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
शॉकवेल इंट्रावेस्युलर लिथोट्रीप्सी प्रक्रिया अत्याधुनिक आहे. रक्तवाहिन्यात साचलेले कॅलशियम वितळविण्यासाठी या पद्धतीची मदत होते. 2017 मध्ये युरोपमध्ये प्रथमच ही प्रक्रिया केली होती. अत्यंत कठीण परिस्थितीतही रक्तवाहिन्यातील कॅलशियम काढणे या पद्धतीमुळे शक्मय होणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश पट्टेद यांनी दिली.
डॉ. सुरेश पट्टेद यांच्या समवेत डॉ. सुहासिनी अथर्गा, डॉ. विजय मेटगुडमठ, डॉ. संजय पोरवाल, डॉ. समीर अंबर, डॉ. प्रसाद एम. आर., डॉ. विश्वनाथ हेसरुर, डॉ. अनुप हंचनाळ आदींनी या उपचार प्रक्रियेत भाग घेतला होता.
अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे वृद्धाला जीवदान देणाऱया वैद्यकीय पथकाचे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी अभिनंदन केले आहे.









