चंद्रावर जाण्यासाठी 2024 ची डेडलाईन अमेरिकी अंतराळ एजन्सी ‘नासा’ने ठरविली आहे. यासाठी एजन्सीने नुकतीच ट्रम्प प्रशासनाला भेट दिली. परवानगी मागितली. यासाठी चंद्रावर उतरवण्यासाठी लागणारा अंतराळवीरांच्या पोशाखांची नव्या पद्धतीने रचना केली आहे. यासाठी एजन्सीने पोशाखाचे दोन नमुने तयार केले. जेणेकरून अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचल्यावर चांद्रपृष्टावर व्यवस्थित चालता यावे यासाठी पोशाखामध्ये नवे तंत्र विकसित केले आहे. 1972 नंतर चंद्रावर जाण्यासाठी मानवी मोहीम राबवली नव्हती.
आता 2024 मध्ये चंद्रावर जाण्यासाठी नियोजन सुरू आहे. हा पोशाख अंगावर चढविताना अन् हालचाली करताना आरामदायी वाटेल, अशी योजना केली आहे. यासाठी पोशाखात लालभडक, पांढरा अन् निळय़ा रंगाचा पॅटर्न वापरला आहे. चांद्रयानाच्या बाहेरील वातावरणातील हालचाली व्हाव्यात. चालणे, वाकणे, पीळ घालणे आदी क्रिया चांद्रवीरांना सहजपणे करता येतात. पोशाखात दोन आर्मस् (रोबो हात) आहेत. विशेषतः चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर अतिशीत वातावरण तर दुसरीकडे 250 फॅरनहाइट तापमान आहे. दोन्ही तापमानात हा पोशाख व्यवस्थित टिकेल. पोशाखातील अंतराळवीरांच्या शरीरावर या वातावरणाचा, तापमानाचा काही फरक पडणार नाही. समजा, चंद्रावर काही कारणास्तव अंतराळवीरांचा अपघात झाला, ऑक्सिजनचा टँक निकामी झाला तर पोशाखात अंतराळवीर सहा दिवस आरामात जिवंत राहू शकतो. तशी रचनाच केली आहे.









