बेळगाव / प्रतिनिधी :
वडगाव येथील आनंदनगरजवळ अत्यवस्थ अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दि. 24 डिसेंबर रोजी सदर इसम आनंदनगरजवळ अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला होता. उपचारासाठी त्याला 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र 30 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या मृत अनोळखी इसमाच्या वारसदारांनी किंवा माहिती असणाऱयांनी शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
सदर अनोळखी इसमाचे वय अंदाजे 50 असून, उंची सुमारे 5 फूट 4 इंच आहे. लांब चेहरा, लांब नाक असून शरीराने सडपातळ आहे. अंगावर गुलाबी आणि काळा रंग मिश्रीत हाफ टी-शर्ट आणि निळय़ा रंगाची पॅन्ट होती. सदर अनोळखी इसमाबाबत अधिक माहिती असणाऱयांनी किंवा वारसदारांनी शहापूर पोलीस स्थानकाशी 0831-2405244 किंवा पोलीस कंट्रोल रूमशी 0831- 2405233 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









