प्रतिनिधी / सातारा
अतिवृष्टी व पुरामुळे ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.
शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबात बाधित शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ,ब,क,क, ड मध्ये अहवाल सादर करावा.
येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही. याची दक्षता घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









