कोडगू /प्रतिनिधी
शुक्रवारी कोडगू जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरे पडून नुकसान झाले आहे. तर शेकडो झाडे मुळासहित कोलमडली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी रस्त्याव पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.
2 रा मोन्नेगेरी शाळेजवळ रस्ता कोसळला आहे. गुरुवारी मध्यरात्री मडिकेरी तालुक्यातील परनेजवळील घर कोसळले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे म्हंटले आहे.