आळते / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अतिग्रे उपकेंद्रामध्ये डॉ. रमेश धोंडीराम कोरवी (वय 40) रा. हरिओम नगर, कोल्हापूर) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून मयत डॉ. रमेश कोरवी यांनी चिठ्ठीत मजकूर लिहून ठेवला आहे. घटनास्थळी हातकणंगले पोलिस दाखल झाले असुन उपकेंद्राचा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला आहे. पोलीसांनी चिठ्ठी संबधित एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.









