प्रतिनिधी/ सातारा
आरटीओ कार्यालयालगत असणाऱया टपऱयांचे अतिक्रमण सातारा नगर पालिकेने हटवले आहे. मात्र या रस्त्यालगत दोन ठिकाणी अद्याप टपऱया उभ्या आहेत. या टपऱया का हटवण्यात आलेल्या नाहीत. यांच्या वर सातारा नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी का मेहरबान आहेत. यांची चर्चा टपरी मालकांच्यातून होत आहे.
शहरात टपऱयांचे अतिक्रमण बोकाळले असून आरटीओ कार्यालय येथील रस्त्यालगत टपऱयांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता. या टपऱया हटवण्याची मागणी जोर धरू लागल्याने पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई पोकळ असल्याची चर्चा सुरू होती. मात्र कारवाईनंतर काही दिवस उलटून अद्याप तिथे टपऱयांचे अतिक्रमण झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर या रस्त्यालगत दोन ठिकाणी चहाच्या टपऱया उभ्या आहेत. सकाळपासून या ठिकाणी चहाचा आस्वाद घ्यायला ग्राहक येतात. महिला ग्राहकांपेक्षा पुरूष ग्राहकांची संख्या जास्त असते. चहा चा आस्वाद घेत तासभर गप्पा रंगतात. यावेळी गर्दी वाढत जावून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर नियम मोडणाऱया कारवाई होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.








