‘तरुण भारत इफेक्ट’
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या शहरी भागात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजून मिळेल तेथे पदपथांवर भाजीपाला, फळे, मासेविपेते बिनधास्त व्यवसाय करत असल्याचे दिसून यऊ लागले होते. मागील काही दिवसांत पदपथ व्यापून व्यवसाय करणाऱयांच्या संख्येत वाढ झाली होती. ‘तरुण भारत’ने या प्रकारावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मडगाव पालिकेने पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया बेकायदेशीर विपेत्यांवर कारवाई करून त्यांना हटविले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येणे शक्मय नसल्याचे आढळून आल्यावर मागील कित्येक दिवसांपासून गांधी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. या मार्केटमधील कित्येक व्यापारी रस्त्याच्या कडेला वा पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करत असल्याचे आणि अशा ठिकाणी लोक रांगेत उभे राहून खरेदी करत नसल्याचे दिसून येत होते. मिळेल तेथे बसून बेकायदा मासळी विकणाऱया विपेत्यांकडेही गदी होऊ लागली होती. स्टेशन रोडवर तर फळ-भाज्या विकणाऱयांनी बस्तानच मांडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ करताना पुढील एक आठवडा लॉकडाऊन व संचारबंदी कडकपणे पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मडगाव पालिका तसेच पोलिसांकडून या बेकायदेशीर विपेत्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेऊन पालिकेला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सदर मोहीम राबविण्यात आली.