शाहूपुरी (सातारा) : शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयातील इ.५ वीतील १ इ. ८ वीतील २ विदयार्थी राज्य गुणवत्ता यादीत, इ. ५ वीतील ११ तर इ. ८ वीतील २१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नागपुरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
इ.५ वीतील बागल वेदांत कृष्णत हा राज्य गुणवत्ता यादीत ७ वा, इ. ८ वीतील कु.कांबळे सिद्धी सुधीर ही राज्य गुणवत्ता यादीत ८ वी व कु. इथापे ईश्वरी हेमंत ही राज्य गुणवत्ता यादीत १४ वी आली. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि विभाग प्रमुख ब्रम्हदेव बाघमोडे व संदीप काटकर यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नागपुरे, उपमुख्याध्यापिका मंगल साळुखे, पर्यवेक्षक विकास महाडीक, सुनील महामुलकर, गुरुकुल प्रकल्प प्रमुख सचिन जाधव यांनी अभिनंदन केले.









