हल्ल्यामुळे प्रकल्पस्थळी आगीचा भडका, सुदैवाने अणुउत्सर्जन नाही
कीव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युपेनमधील युद्ध नवव्या दिवशीही सुरूच आहे. रशियन सैन्याने झापोरिझिया अणुऊर्जा केंद्रावर (न्यूक्लियर प्लान्ट) शुक्रवारी ताबा मिळवला. येथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रावर आग लागल्यामुळे हाहाकार उडाला. मात्र, अग्निप्रलयानंतरही अणुउत्सर्जनाचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही देशांना मोठा दिलासा मिळाला. झापोरिझियावरील हल्ल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी पुतीन यांनी संपूर्ण युरोप धोक्मयात आणल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशाबाहेर पलायन केल्याचे दावे-प्रतिदावे करण्यात येत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांसमोर येत युक्रेनविरोधी थांबवले जाणार नसल्याचा इशारा पुन्हा एकदा दिला. तसेच मोहीम फत्ते होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही पुतीन यांनी व्यक्त केला आहे.
रशियन सैन्याने शुक्रवारी प्लान्टचे प्रशासन आणि नियंत्रण इमारती ताब्यात घेतल्या. त्याचवेळी, रशियन सैन्याने चेर्निहाईव्हमध्ये 24 तास हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 47 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांना माहिती दिल्यानंतरच रशियाने झापोरिझियामधील अणुऊर्जा केंद्रात प्रवेश करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्लान्टमधून रेडिएशनची पातळी वाढण्याची चिन्हे नाहीत. रेडिएशनच्या शक्यतेवर अमेरिकाही बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
रशियाकडून आण्विक दहशतवादाचा अवलंब ः झेलेन्स्की
रशियाने आण्विक दहशतवादाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. पुतीन यांना चेरनोबिल अणु अपघातासारखी दुसरी घटना घडवून आणायची असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. रशियन सैन्याने झापोरिझिया न्यूक्लियर प्लान्टवर हल्ला केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे वक्तव्य आले आहे. आतापर्यंत रशियाशिवाय अन्य कोणत्याही देशाने अणुप्रकल्पावर हल्ला केलेला नाही. इतिहासात हे प्रथमच घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
द्विपक्षीय चर्चेत दिसली सकारात्मकता
दोन्ही देशांमधील शांतता चर्चेच्या दुसऱया फेरीत मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्यावर सहमती झाली आहे. या कॉरिडॉर अंतर्गत युद्धक्षेत्रातील लोकांपर्यंत अन्न आणि औषध पोहोचवण्याचे काम केले जाईल, असे चर्चेनंतर युपेनने सांगितले. तथापि, चर्चेवर समाधानी नसल्याची स्पष्टोक्ती देत लवकरच तिसरी फेरी बोलावली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
युपेनच्या मदतीला 16,000 परदेशी स्वयंसेवक
लष्करासोबतच 16,000 विदेशी स्वयंसेवकांनीही रशियन हल्ल्याविरोधात मोर्चा हाती घेतला आहे. त्यांनी जगातील इतर लोकांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडे गमावण्यासारखे काही नाही पण स्वातंत्र्य असल्याचे झेलेन्स्की यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
अमेरिकेचे रशियावर नवे निर्बंध
युद्धादरम्यान अमेरिकेने शुक्रवारी रशियावर नवीन निर्बंध लादले. पुतीन यांचे प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांच्यासह 66 रशियन नागरिकांच्या व्हिसावर बंदी घालण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियाच्या संरक्षण निर्यातीवर निर्बंध लादले होते. तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकने रशिया आणि बेलारूसशी संबंधित व्यवसाय निलंबित केला आहे. याशिवाय अमेरिकेने युपेनच्या लोकांना तात्पुरता संरक्षित दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे युपेनचे नागरिक 18 महिने कोणत्याही निर्बंधाशिवाय देशात राहू शकतात. युपेनला 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 75 हजार 911 कोटी रुपये) मदत देण्याचा प्रस्तावही बायडेन प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला पाठवला आहे.
झेलेन्स्कींच्या पलायनाची चर्चा
युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे युपेनची राजधानी कीव्हमधील एका बंकरमधून पोलंडला पळून गेल्याची चर्चा शुक्रवारी प्रसारमाध्यमांवर रंगली. रशियन मीडियाने हा दावा केला होता. मात्र, युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून याबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला. त्यानुसार झेलेन्स्की कीव्हमध्येच असून त्यांनी देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगण्यात आले. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या स्पष्टोक्तीनंतर पलायनाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. युद्ध सुरू झाल्यानंतर व्हिडीओ संदेश जारी करत झेलेन्स्की यांनी आपण देश सोडून पळून जाणार नसल्याचे जाहीर केले होते.
9 दिवसांपासून सुरु आहे युद्ध
गेल्या 9 दिवसांपासून रशिया युपेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युपेनचे सैन्य रशियाशी सतत्याने लढत आहे, परंतु रशियन सैन्याची संख्या खूप जास्त आहे. त्याचवेळी रशिया युपेनची राजधानी कीव्हसह सर्व शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यामुळे युपेनला सर्वाधिक फटका बसला आहे. बहुतेक रशियन क्षेपणास्त्र हल्ले लष्कराच्या तळांवर झाले आहेत, ज्यात हजारो युपेनियन सैनिक मारले गेले आहेत. त्याचबरोबर गेल्या 9 दिवसांत रशियाचे 9 हजारांहून अधिक सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
भारतीयांच्या घरवापसीचा पंतप्रधानांकडून आढावा
रशिया-युपेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांनी ‘ऑपरेशन गंगा’च्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी युपेनमधून भारतीयांचे स्थलांतर आणि तेथील परिस्थितीवरही चर्चा झाली. बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि एनएसए अजित डोवाल उपस्थित होते. युपेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांची ही आठवी बैठक होती. याआधी बुधवारी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. रशिया आणि युपेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी सातत्याने अशा आढावा बैठका घेत आहेत.
आतापर्यंत 9,000 हून अधिक नागरिक मायदेशी
ऑपरेशन गंगा अंतर्गत रोमानिया आणि हंगेरी येथून 630 भारतीय नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाची आणखी तीन विमाने गुरुवारी रात्री उशिरा हिंडन एअरबेसवर परतली. युपेनमधून आतापर्यंत 9,000 हून अधिक नागरिकांना भारतात परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारतीयांना युपेनमधून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही बोलले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली चार केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘ऑपरेशन गंगा’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत युपेनच्या चार शेजारील देशांमध्ये उड्डाणे जाऊन भारतीयांना मायदेशी आणले जात आहे.









