
प्रतिनिधी /काणकोण
कोरोना महामारीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून बंद असलेल्या शाळा सोमवार दि. 21 पासून नियमित सुरू झाल्याचा मनमुराद आनंद काणकोण तालुक्यातील मुलांनी घेतला अशी माहिती सेंट तेरेझा हायस्कुलचे शिक्षक नारायण देसाई यानी दिली.
मार्च 2020 साली जे विद्यार्थी 1 ल्या इयत्तेतमध्ये होता. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये एकदम तिसऱया इयत्तेमध्ये प्रवेश घेताना त्याचा चेहरा प्रफुल्लीत झालेला आपल्याला पहायला मिळाला असे मत श्री. देसाई आणि प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने व्यक्त केले. मागच्या अडीच वर्षांपासून शाळा जरी बंद असल्या तरी काही खाजगी अनुदानित शाळा मध्ये मध्ये सुरू करण्यात येत होत्या. या तालुक्यातील 5 वी ते 10 पर्यंतचे वर्ग काही शाळांतून 16 फेब्ा्रgवारी पासून सुरू करण्यात आले होते. शाळा बंद असल्याचा सर्वाधिक परिणाम प्राथमिक शाळेतील मुलांवर झालेला होता. हे वय खेळण्या बागडण्याचे असताना मुलांना अक्षरशा कोंडून ठेवल्यासारखी गत झाली झाली होते. मुलांचा एका प्रकारे कोंडमारा झाला होता. त्यातच शालेय गणवेषाची अट शिक्षण खात्याने सद्या तात्पुरती काढुन टाकलेली असल्यामुळे रंगीबेरंगी कपडयात शाळेत आलेली आणि मधल्या वेळेत पटांगणावर बागडणारी मुले म्हणजे मैदानावर जणू फुलपाखराचा थवाच बागडत आहे असे चित्र काही शाळांतून बघायला मिळाले. शाळेत आलेली मुले तब्बल अडीच वर्षानंतर मैदानावर खेळताना पाहून बालपण देगा देवा असे म्हणण्याची वेळ आली असे मत एका बालरथ चालकाने व्यक्त केले. तर मुलांना बालरथांत बसलेली आणि नाचणारी, बागडणारी पाहून क्षणभर थकवा देखील दूर झाला असे मत काही बालरथ चालकांनी तसेच शाळेतील शिपाई वर्गाने व्यक्त केले.
या तालुकयातील सर्व शाळघतील बालरथ नेहमीप्रमाणे मुलांना आणायला गेले. काही शाळा मधल्या सुटीनंतर सोडण्यात आल्या. शिक्षण खात्याने जे नियम अटी घालून दिलेले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करूनच वर्ग भरविण्यापत येत असून कसलाच धोका पत्करण्यात येणार नसल्याचे मत माशे येथील निराकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक आणि निराकार विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम वेळीप यानी व्यक्त केले. लवकरच वार्षिक परीक्षा होऊन परत शाळेला सुटी पडणारी असली तरी मुलाना शाळेत येण्याची सवय लागायला हवी. त्यामुळे शिक्षण खात्यानी जो निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागतच करायला हवे असे मत किंदळे पणसुले येथील श्री. कात्यायणी बाणेश्वर विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताजी गावकर यानी व्यक्त केले.









