ऑनलाईन टीम / मुंबई :
पनवेलमध्ये 2.45 कोटींच्या वीजचोरीप्रकरणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. जियाउद्दीन पटेल असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून, तो स्टोन क्रशिंगचा व्यवसाय करतो. पनवेल महानगर पोलीस ठाण्यात पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पटेल याला वीजचोरीप्रकरणी महावितरणने 1.30 कोटींचा दंड ठोठावला आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याने पुन्हा वीजचोरी केली. त्याने क्रशरच्या मीटरमधील सिटी सेकंडरीमध्ये बाह्य वस्तू बसवून तसेच वास्तविक वीज वापरापेक्षा कमी वीज वापराची नोंद होण्याची सहहेतुक व्यवस्था केली असल्याचे उघड झाले. सदर मीटर जप्त करण्यात आले आहेत. पटेलने या आठवडाभरात तब्बल 1.15 कोटींची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.









