जलसंपदा मंत्री जयंत पाटील : पाणीपट्टी न भरल्यास योजना ठप्प होतील : मंत्र्यांना चिंता
प्रतिनिधी/कवठेमहांकाळ
अनेक अडथळे पार करून टेंभू योजना सुरू झाली आणि टेंभूच्या लाभक्षेत्रात येणाया गावांमध्ये विकासाची आर्थिक पहाट उजाडून प्रगतीचा मार्ग रिकामा झाला. पण, नियमित पाणी मिळवण्यासाठी शेतकयांनी आपली पाणीपट्टी भरावी असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. पाणीपट्टी न भरल्यास सिंचनयोजना बंद होतील, अशी भीती मंत्री पाटील यांनी व्यक्त केली
टेंभू योजनेच्या ढालगाव वितरिका आणि कवठेमंहाकाळ कालव्यातून देण्यात येणाया पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यानंतर झालेल्या समारंभात मंत्री पाटील बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाचे प्रश्न सुटले. मात्र, पाण्याचा प्रश्न सुटला नाही म्हणूनच की काय काही वर्षांपूर्वी लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी पदयात्रा काढली होती. शेतकऱयांना पाणी मिळावे, त्यांचे जीवन समृद्ध बनावे, हाच हेतू या पदयात्रे मागचा होता. आज स्व. बापूंचे स्वप्न पूर्ण होत आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून पाणी परिषदा झाल्या. मोर्चे आंदोलने झाली. परंतु पाण्याचा प्रश्न सुटला नाही. दोन पिढÎांनी शेतीसाठी पाणी मागितले होते. आज तिसऱया पिढीला शेतीसाठी पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हातून हे पाणी देण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे जयंतराव पाटील म्हणाले.
1995 साली युतीचे राज्यात सरकार आले होते. 1998 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी टेंभूचे भूमिपूजन केले. परंतु भूमिपूजन करताना कोणतीही सरकारी प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. त्यांचे शासन गेले व आघाडी शासन आले, शासनाने मात्र, योजनेवर पैसे खर्च करणे म्हणजे शासनाचा निधी वाया जाईल, असे नमूद सरकारी अधिकाऱयांनी केले होते. परंतु आपण अर्थमंत्री असताना या योजनेचा पाठपुरावा केला. ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला म्हणूनच अर्थसंकल्पामध्ये दहा हजार कोटी रुपये देऊ शकलो, असे स्पष्टीकरण मंत्री पाटील यांनी केले.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून टेंभू योजना अखेर सुरू झाली. या योजनेतून शेतकऱयांना पाणी देण्याचा मार्ग रिकामा झाला. टेंभूसह जिह्यातील सिंचन योजनेतून शेतकऱयांना पाणी मिळेल. मात्र, पाणीपट्टी वेळेत भरून सातत्याने पाणी मिळेल, असे काम शेतकऱयांनी करावे. पाणीपट्टी भरली नाही तर ही योजना ठप्प होईल, अशी भीती जलसंपदा मंत्र्यांनी व्यक्त केली.
स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतीच्या पाण्यासाठी प्रयत्न केले. आज पाणी आले आहे. आमदार सुमनताई पाटील ही शेतीच्या पाण्यासाठी नेहमी आग्रही असतात. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात शेतीसाठी सातत्याने सिंचन योजना सुरू व्हावी, ही भावना आ. सुमनताई त्यांच्या मनात असते. भविष्यात शेतकऱयांना पाणी कमी पडणार नाही, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.
बोरोबा देवस्थानच्या निधीबाबत बोलताना जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, मागील शासनाने पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, आले चाळीस लाख उर्वरित चार कोटी साठ लाख रुपये इतका निधी आरेवाडी बिरोबाच्या बनाच्या विकासासाठी देण्याबाबत आपण सुमनताई यांच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
टेंभू योजना पूर्ण व्हावी म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरीसह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी मदत केल्याने ही योजना पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी स्वर्गीय आर आर आबा पाटील, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनीही प्रयत्न केले आहेत. आता या टेंभू योजनेसाठी चांदोली धरणातून काही पाणी मिळावे, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी केली. स्व. आर आर पाटील यांचे स्वप्न आज सत्यात उतरले टेंभूचे पाणी एकतीस गावाला मिळाले. या पाण्यातून कवठेमहांकाळ तालुक्याचा पूर्व भाग संपन्न बनेल. तसेच हे पाणी भरून घेण्यासाठी शेततळी मंजूर होणे गरजेचे आहे. येरळा नदी बारमाही करावी म्हैसाळचे पाणी काही दिवस सुरू ठेवावे आणि आरेवाडीच्या बनासाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केले.
अनेक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे टेंभू योजना पूर्ण होऊन पाणी मिळाल्याची भावना अनिता सगरे, चंद्रकांत हाक्के, संजय हजारे यांनी व्यक्त केली. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील आणि प्रास्ताविक केले. टेंभू योजना किती महत्वाचे आहे, हे स्पष्ट केले. स्व. आर आर पाटील, जयंतराव पाटील, खा. संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी प्रयत्न केल्याची त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेशभाऊ पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, आशाराणी दत्ताजीराव पाटील, सभापती विकास हाक्के, बाळासाहेब गुरव, नीलम पवार,महेश पवार जगन्नाथ कोळेकर, साधना कांबळे, पांडुरंग यमगर, माणिकराव भोसले, धनाजी पाटील, धनाजीराव भोसले, दादासाहेब कोळेकर, अय्याज मुल्ला,प्रा. दादासाहेब ढेरे, मारुती पवार, सुरेखाताई कोळेकर यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते मोठÎा संख्येने उपस्थित होते.








