प्रतिनिधी / मडगाव
एका अल्पवयीन मुलाला मारहाण करणे तसेच या मुलाच्या मातेला धमकी दिल्याचा आरोप असलेल्या कुंकळ्ळी परिसरातील संशयित आरोपी रघु तळेकर याला काही अटी घालून जामिनावर सोडण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. 10 हजार रुपयांच्या जामिनावर तसेच तितक्याच रकमेची हमी सादर करावी, या प्रकरणातील पुराव्याकडे ढवळाढवळ करता कामा नये अशा न्यायालयाने अटी घातलेल्या आहेत.
संशयित आरोपी रघु तळेकर याला कुंकळ्ळी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 323, 506(2) कलमाखाली तसेच चिल्ड्रन्स कायद्याच्या इतर कलमाखाली अटक केली होती.









