बाकू
अझरबैजानमध्ये मंगळवारी प्रशिक्षण उड्डाणादरम्यान एक सैन्य हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. सीमा रक्षक सेवा आणि अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका संयुक्त विधानानुसार सीमा रक्षक सेवेचे हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी गॅरेबात प्रशिक्षण मैदानावर उड्डाण करताना कोसळले आहे.
ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही. दोन शासकीय यंत्रणा या दुर्घटनेचा तपास करत आहेत. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह आणि त्यांच्या पत्नी मेखरिबान अलीयेवा यांनी मृतांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.









