बाळेकुंद्री / प्रतिनिधी
अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सौंदत्ती ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाल्याची घटना सौंदत्ती शहराजवळील जी. जी. चोप्रा कॉलेजच्या नजीक शनिवारी रात्री घडली.
यल्लाप्पा तळवार वय ५९ असे मयत झालेल्या दुर्दैवी सहा. उपनिरीक्षकाचे नाव आहे. सौंदत्ती पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. ते बैलहोंगल तालुक्यातील आनिगोळ गावचे रहिवासी होते. शुक्रवारी रात्री असुंडी गावात सेवा बजावून परत सौंदत्ती पोलिस ठाण्यात येताना शहराच्या जी.जी. चोप्रा कॉलेजच्या रस्त्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर उडून पडले. त्यांच्याडोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान बेळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात घडलेली ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात बेळगाव येळ्ळूर रस्त्यावर पीएसआय गणाचारी यांचा अपघातात मृत्यू झाला होता. सौंदत्ती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.









