प्रतिनिधी / शिरोळ
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील शाकंबरी मोबाईल व सुयोग पान , बेकर्स या दुकानाचे शटर्सचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २२ हजार ५९९ रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली, याबाबतची फिर्याद उदय दत्तात्रय जोशी यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या दोन नंबरच्या गाळ्यामध्ये उदय जोशी यांचे दुकान असून यामध्ये मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून,लोखंडी सळीने शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील मोबाईल संच, रोकड व अन्य साहित्य असा मुद्देमाल चोरुन नेला. बुधवारी सकाळी दुकान मधील चोरीचा प्रकार उघडकीस आला , अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









