तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह २५ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना मंगळवार दि.१ च्या रात्री पिंपळनेर ( ता. माढा) येथे घडली.
फिर्यादी प्रमोद चंद्रकांत ढगे ( वय ३५, रा पिंपळनेर) यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी ढगे यांचे पिंपळनेर येथे कृषी सेवा संजीवनी सेवा केंद्र हे दुकान असून दुकानाच्या मागेच त्यांची दुमजली इमारत आहे. मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे कुटुंबिय जेवण करुन घरी झोपले असता चोरट्यांनी घराचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश करुन हॉलमधील कपाटातील १० हजार ८०० रुपये किमतीचे दोन मोबाईल, ७०० रुपये किमतीची नथ व रोख १३ हजार ५०० रुपये असा २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









