ऑनलाईन टीम
प्रत्येक माणसाला लहानपणापासून जंगलांची, प्राणी-पक्षांची ओढ असते. या सगळ्याच गोष्टींबद्दल सुप्त आकर्षण असतं. जस-जसे आपण मोठे होत जातो, तसं हे आकर्षण बाजूला पडतं. प्राण्यांच्या प्रजाती, त्यांची जात, ते जिवंत असण्याची नैसर्गिक गरज, भूतदया, अभयारण्य या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत जातं. याच सगळ्या गोष्टींबद्दलची जागरूकता पुन्हा एकदा तयार व्हावी आणि अभयारण्याच्या जगात पुन्हा एकदा जाऊन जगता यावं, अभयरण्यातले घटक माणसाबद्दल काय विचार करत असतील याचा लेखनातून आणि सादरीकरणातून शोध घेता यावा यासाठी एक अनोखी अभयारण्य स्पर्धा सुरू झालीय.
ठाण्याची अजेय संस्था ‘अभयारण्य-चला निसर्ग होऊ या..’ ही स्पर्धा सध्या घेत आहे. लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची ही संकल्पना असून गौरव संभूस हे निर्माता आहेत. ह्या स्पर्धेचे नियोजन फॉरेस्ट ऑफिसर्स कार्तिक हजारे, पल्लवी गोडबोले आचार्य, विदुला खेडकर,नलिनी पुणेरी यांनी केले आहे. स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सहभागी स्पर्धकांनी प्राणी, पक्षी, नदी, डोंगर, झाडं आदी विषयांपैकी अभयारण्यातील एक घटक निवडला आहे.
14 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दोन प्रश्न आले. या प्रश्नांवर निवडलेला घटक बनून त्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नांची उत्तरं स्पर्धक देत आहेत. 25 एप्रिल रोजी अभयारण्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शतकोटी रसिक या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संध्याकाळी 5 ते 9 या वेळात पार पडली. या सर्धेची अंतिम फेरी ही 1 मे रोजी फेसबुकवर Zapurza या पेजवर Live होणार आहे. या स्पर्धेत 25 एप्रिल रोजी प्राणीमित्र भुपेन कुलकर्णी यांनी प्रेक्षकांशी पक्षी-सृष्टी या विषयावर संवाद साधला आहे. 1 मे रोजी अजून काही प्राणीमित्र प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रथमेश जोशी, ओंकार कदम, श्वेता कोहोजकर हे तीन प्राणिमित्र पाहुणे कार्यक्रमाला लाभले आहेत. संस्थेतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना अभयारण्य स्पर्धेत बिनधास्त येण्याचे मनःपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. ऑनलाईन स्वरुपात होणारा हा स्पर्धेचा कार्यक्रम विनामूल्य आहे.
संपर्क क्रमांक :- +91 9930175527, +91 8928864171, +91 9082269538
Facebook Page Link – http://Fb.me/zapurza2021









