गोवर रुग्णसंख्येची दैनंदिन नोंद स्थिर होत असताना पुन्हा पेंचित वाढणे, त्याचवेळी ठराविक कालावधीनंतर मृत्यूची नोंद होणे हे सरकारी उपाय योजनांवर पाणी ओतणारे आहे. त्यामुळेच गोवरच्या साथीवरील उपाययोजनांच्या निसटत्या दुव्यांकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. अजूनही लसीकरणाऐवजी हकीम वैद्यांच्या उपचारांचा आधार वाटावा हेच मुळात न पटण्यासारखे आहे. मग आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱया उपाय नियोजनांचा अर्थच काय उरतो
सध्या गोवर रुग्णांच्या कुटुंबियांकडून उपचारासाठी दाखविण्यात येणारी अनास्था ही अंधश्रद्धेच्या जोखडात गुंतलेली असल्याची दुसरी बाजू याच काळात समोर येत आहे. अंधश्रद्धेचा अनुभव गोवर बाधित भागांतील उपचार करत असलेले स्थानिक डॉक्टरच सांगत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईत गोवरचे एकूण संशयित 5017 असून 485 बाधित तर 13 मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. यात एम पूर्व, एच पूर्व सह इतर 16 वॉर्डांतील 68 हेल्थ पोस्टच्या कक्षेत येणारा परिसर बाधित विभागात मोडत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्यात 20 गोवर मृत्यू असून 1 हजार 55 निश्चित तसेच 16 हजार 597 संशयित रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. गेले वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेले असताना येणारे वर्ष गोवरची चिंता घेऊन आले आहे. कोरोनाप्रमाणेच गोवर बाधितांमध्ये मुंबई आघाडीवर असून यात गोवंडीसारख्या परिसरात गोवरचे दिवसाकाठी 5 ते 6 रुग्ण आढळून येत असल्याची माहिती येथील स्थानिक डॉक्टर देत आहेत. गोवर सदृश्य लक्षणे असलेली मुले डॉक्टरांपर्यंत पोहचत नाहीत अशी तक्रार स्थानिक डॉक्टर तसेच पालिका प्रशासनातील अधिकारी वर्गही करत आहेत. यातून वेगळीच भीती व्यक्त करण्यात येत आहे. गोवंडीसारखा भाग उद्रेक केंद्र वर्तविण्यात आला. तरीही मुलांना तपासण्यासाठी डॉक्टरांकडे आणलेच जात नाही. तरी देखील गेल्या काही दिवसांपासून स्थानिक डॉक्टर, पालिका प्रशासन व धर्मगुरु यांच्या माध्यमातून जनजागफती केली जात आहे, असे असूनही येथील पालक मात्र गोवरची लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्याकरीता दुर्लक्ष करत आहेत, परिणामी, मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर मुलांना रुग्णालयात दाखल केले जात असल्याची सद्य स्थिती आहे. पालकांच्या या हलगर्जीपणामुळे नाहक मुलांचा बळी जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 20 गोवर मृत्यू सांगण्यात येत असून यातील मुंबईतील 14, भिवंडीत 3, ठाणे 2 तर वसई विरार परिसरातून 1 असे मृत्यू असल्याचे राज्य सरकारचे आरोग्य विभागाची माहिती सांगते. तरीही यात मुंबईतील गोवंडी परिसर आघाडीवर असून त्या ठिकाणी तातडीने उपाययोजनांची अमंलबजावणी सुरु आहे. या ठिकाणी गोवरबाबत जनजागफती करुन मुलांना लस देण्याबाबत सांगण्यात येत आहे. मात्र घरोघरी गेलेल्या आरोग्य सेविकांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यातून मार्ग काढत तपासणीसाठी आलेल्या गोवर संशयित रुग्णाच्या पालकांकडून देखील शेजारी गोवर लक्षण असलेल्या मुलांना डॉक्टरांकडे आणण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान या ठिकाणी प्रतिदिवस 4 ते 5 गोवर संशयित रुग्ण आढळून येत असल्याचे स्थानिक डॉक्टर सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर पेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आयोजित केलेल्या कार्यशाळेला महत्त्व येत आहे. या कार्यशाळेत लवकरात लवकर गोवरवर नियंत्रण मिळवून येत्या 2023 पर्यंत गोवरचे समुळउच्चाटन करण्यासाठीची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यशाळेत देशभरातील डॉक्टर्स, तज्ञ उपस्थित होते. समाजमाध्यमांनी गोवर आणि लसीकरणाविषयी जास्तीत जास्त सकारात्मक माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, तसेच गोवर-रुबेला या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळेस सर्व स्तरावरुन करण्यात आले. यात 5 वर्षांखालील मफत्यू होण्यामागे गोवर-रूबेला हा आजार मुख्य कारणांपैकी एक आहे. त्यात कुपोषण वाढल्याने त्यातून उपचारांमधील अडथळे वाढतात. न्यूमोनिया, डायरिया, फुप्फुसाचा संसर्ग ही गुंतागुंत वाढते. पण, यावर लसीकरण सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. 1985 पासून जगभरात लसीकरणासाठी लस वापरली जाते. त्यातून सहव्याधी आणि मफत्यू कमी होण्यास मदत होते. मात्र, कोविड 19 मुळे लसीकरण मोहिमेवर मोठा परिणाम झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गोवरचे रुग्ण झपाटय़ाने वाढले असल्याचे निरीक्षण मांडण्यात आले. यातून मफत्यूंचे प्रमाणही वाढत असल्याचे सांगण्यात आले. देशभरातील सुमारे 75 टक्के मुलांना लसीकरण झाले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यातूनच लसीकरण वाढवण्यावर भर दिला पाहिजे असे युनिसेफ आरोग्यतज्ञ डॉ. आशिष चौहान यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षात गोवर लसीकरण न झाल्यानेच ही साथ आल्याचे सांगण्यात आले. कोविडमुळे मुलांना आवश्यक असणाऱया लसीकरणाची गती मंदावली. गोवरचे सर्वाधिक रुग्ण बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात आढळले आहेत. बाळाला लसीकरणासह व्हिटामिन ए ची गोळी दिली गेली पाहिजे. यात रोगप्रतिकारकशक्ती पुन्हा वाढते. यासह गर्भवती महिलेची प्रकृती चांगली असणेही महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी जर गोवरचा आउटब्रेक वाढला तर तात्काळ सर्विलिन्स वाढवला पाहिजे. 2019 मध्ये 95 टक्के पहिला डोस पूर्ण झाले होते. 84 टक्के मुलांचा दुसरा डोस झाला आहे. दोन्ही डोसचे प्रमाण 95 टक्के होणे आवश्यक असल्याचे पेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. वीणा धवन यांनी या परिषदेत स्पष्ट केले. तर मध्य प्रदेशचे लसीकरण संचालक डॉ. एस. शुक्ला यांच्या मते गोवरच्या नियंत्रणासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग गरजेचा असून लक्षणावर भर देत जागरुकता वाढवली पाहिजे. जेणे करुन उद्रेक संख्या घटती ठेवण्यास मदत होईल.
गोवर संसर्गावर मात एकत्रितपणे केला जात आहे. आशा सेविकांपासून ते अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शहरविकास विभाग, पालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, शहरातील प्रभाग कार्यालये, तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती असा प्रत्येक घटक यात उतरला आहे. कोरोनाच्या संसर्गावेळी देखील अशाच स्वरुपातील काही समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र लसीकरणातूनच कोरोना नियंत्रणात आला आहे. या कोरोना काळात लसीकरणावाचून दूर राहिलेल्या मुलांना शोधणे आवश्यक आहे. सर्व स्तरातील मुलांना किती लसीकरण झाले याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. जेणे करुन संसर्ग नियंत्रणात येऊ शकेल.
राम खांदारे








