पुणे \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असलं तरी राजकीय वर्तुळाक विविध चर्चांना मात्र उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. शरद पवारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट आहे, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
२०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट आहे का ? असं विचारण्यात आलं असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं आहे, असे म्हणत अजित पवार यांनी विषयाला पूर्णविराम दिला.
पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशांत किशोर यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








