ऑनलाईन टीम / पुणे :
माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह पाटील (वय 50) यांचे आज पहाटे पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झाले. आज सायंकाळी त्यांच्या तेर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अमरसिंह पाटील मागील काही दिवसांपासून एका आजाराने त्रस्त होते. त्यांच्या डोक्याची एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अमरसिंह पाटील हे मुळचे उस्मानाबाद जिह्यातील तेर या गावचे. तेर या गावचे सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्ष कारभार पाहिला होता.









