अण्णा नाईक फेम माधव अभ्यंकर यांनी घेतली उदयनराजे यांची भेट
प्रतिनिधी/सातारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अन् खासदार उदयनराजे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांचे कोरोना काळात सातारा जिह्यातील दौरे वाढले आहेत. त्यावरून खासदार उदयनराजे यांनी चक्क गुगली टाकत माझे विचार रुजवण्यासाठी त्यांनी सातारा जिह्यात सातत्याने यावे आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ, त्या सूचना आचरणात आणण्याचे काम त्यांच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे. ते करतीलही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक फेम माधव अभ्यकर हे खासदार उदयनराजे यांच्या भेटीला जलमंदिर पॅलेस येथे गेले होते. त्यावेळी सातारच्या मीडियाने त्यांची भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी खासदार उदयनराजे यांना पत्रकारांनी अजितदादा यांच्या वाढत्या दौऱयाबाबत छेडले असता ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे, त्यांच्याशी निगडीत नाही पण त्यांच्याकरता पण ते माझ्या मताशी सहमत आहेत. त्यांना सांगितलं की आपण जास्त जवळ येथे करा म्हणजे जास्तीत जास्त माझे विचार आहेत त्यांना चालना देण्याचं काम मंत्री या नात्याने तुमचं कर्तव्य आहे. आम्ही वेळोवेळी सूचना देत जाऊ त्या आचरणात आणण्याचं काम तुमच्यासारख्या अनुभवी आणि तज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि करतील, असा सल्ला त्यांनी अजितदादा यांना दिला.
अण्णा नाईक असोमी
अण्णा नाईक यांच्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मनापासून मी त्यांचं स्वागत करतो. ते अभिनय चांगला करतात. ते मलाच काय पण सर्वांना आवडतात. त्यांच्याकडे नॅचरल अभिनयाची कला आहे असतात. ही कला काहीच्यामध्ये उपजत असते. अण्णा नाईक असोमी हा त्यांचा आवाज खासदार उदयनराजे यांनी काढला अन आपण ही अण्णा नाईक असल्याचे दाखवून दिले.
शेवंता पाठोपाठ अण्णा नाईक ही साताऱयात
काही दिवसांपूर्वी शेवंताची भूमिका करणारी अभिनेत्री अपूर्वा ही जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे यांची भेट घेऊन गेली. शाहूपुरी येथे त्यांनी आपली फर्म ही सुरू केली आहे. तीनच दिवसांपूर्वी त्या सातारच्या कास पठारावर रपेट मारून गेल्या होत्या. त्यापाठोपाठ अण्णा नाईक हेही साताऱयात आल्याने मीडियाने त्यांचा पाठलाग केला.









