यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी बराच बदललेला दिसून येतो आहे. रनिंग बिटविन द विकेटमधील त्याचा वेग मंदावला आहे आणि मोठे फटकेही आटले आहेत. यष्टीरक्षणात त्याने जरुर चपळता दाखवली. पण, एकंदरीत 14 महिन्यांच्या कालावधीनंतर पुनरागमन करणे सोपे असत नाही, हेच त्याच्यावरुन दिसून येते आहे. हा धागा पकडत अजय जडेजाने सध्याच्या पिढीला आजचा धोनी आठवावासा वाटणार नाही, अशी टिपणी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईला सलग दोन्ही सामने गमवावे लागले असून त्याची फलंदाजी फारशी आश्वासक ठरलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजय जडेजा बोलत होता. ‘धोनीने जो फलंदाजी क्रम निवडला, तो तर निव्वळ निराशाजनक आहे. पाठीमागून येऊन कोणतीही लढाई लढली जात नाही. लढाई जिंकायची असेल तर स्वतः पुढे येऊन लढावे लागते. धोनी सध्या खूपच खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा हा खराब फॉर्म आठवणे कोणालाही रुचणार नाही’, असे अजय जडेजाने पुढे नमूद केले. 39 वर्षीय धोनी जागतिक क्रिकेट वर्तुळातील महान खेळाडूंपैकी एक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च यश त्याने बऱयाचदा प्राप्त केले आहे, मानसन्मान प्राप्त केला आहे. यंदा आयपीएल स्पर्धेच्या उंबरठय़ावरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर फक्त आयपीएलमध्येच खेळणार असल्याने त्याच्याकडून चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत. पण, पहिल्या दोन सामन्यात तो या अपेक्षांना खरा उतरु शकला नाही. आता पुढील लढतीत तो ही कसर भरुन काढणार का, याचे चाहत्यांना औत्सुक्य असेल.
Previous Articleक्वॉरंटाईननंतर जोस बटलर सज्ज
Next Article सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









