ऑनलाईन टीम / मुंबई :
देशभरातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असलेला डॉ. बॉम्ब उर्फ मोहम्मद जालीस अन्सारी काल हा अग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आलाच नाही. सध्या तो पॅरोलवर बाहेर असून, तो फरार झाला आहे.
डॉ. बॉम्ब याच्या कुटुंबियांनीही तो फरार झाल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. अग्रीपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
1993 मध्ये अजमेर येथील बॉम्बस्फोट प्रकरणात तो दोषी आढळला. त्यानंतर चौकशीअंती त्याचा देशभरातील अनेक बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, सध्या तो 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आहे. उद्या त्याची पॅरोलची मुदत संपत आहे. यापूर्वी तो दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी येत होता. मात्र, कालपासून तो फरार आहे.









