प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तिदिनानिमित्त देण्यात येणारी मुख्यमंत्री पदके जाहीर करण्यात आली असून अग्निशमक दलाच्या तीन कर्मचाऱयांना ही पदके जाहीर करण्यात आली आहे. म्हापसा फायर स्टेशनचे सहाय्यक अधिकारी अशोक परब, तसेच दीपक शेटगावंकर व सिताराम कामत दोघेही पणजी फायर स्टेशन, यांचा समावेश आहे. गोवा मुक्तीदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना पदके बहाल केली जातील.









