प्रतिनिधी/ पणजी
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देण्यासाठी अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी आयोजित 35 वी वार्षिक कवायत स्पर्धा नुकतीच पार पडली.
पणजीतील सांतीनेज येथील फायर फोर्स प्रशिक्षण मैदानावर शनिवारी आयोजित या स्पर्धेत राज्यातील सर्व अग्निशामक केंद्रांमधील कर्मचारी सहभागी झाले होते. स्क्वॉड ड्रिल, लॅडर ड्रिल, पंप ड्रिल आणि टग ऑफ वॉर यांचा समावेश असलेल्या या स्पर्धांचा अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा खात्याचे संचालक नितीन रायकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात केला.
अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे तसेच स्पर्धेतील सहभागींना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत.
स्क्वाड ड्रिल : प्रथम – अग्निशामक दल मुख्यालय, द्वितीय – फायर स्टेशन (म्हापसा) आणि तृतीय – फायर स्टेशन (पिळर्ण)
शिडी ड्रिल : प्रथम – अग्निशामक दल मुख्यालय, द्वितीय – फायर स्टेशन (म्हापसा) आणि तृतीय – फायर स्टेशन (वाळपई)
पंप ड्रिल : प्रथम – अग्निशामक दल मुख्यालय, द्वितीय – फायर स्टेशन (पेडणे) आणि तृतीय – फायर स्टेशन (म्हापसा)
रस्सीखेच : फायर स्टेशन (फोंडा)
भारतीय सैन्याचे सुभेदार रवींद्र सिंग आणि गोवा स्टेशन फायर ऑफिसर गोपाळ शेट्यो (निवृत्त) यांनी कार्यक्रमांचे परीक्षण केले. तर स्टेशन फायर ऑफिसर श्रीपाद गावस यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.









