दुरूस्तीकडे कानाडोळा, मोठा अपघात घडण्याची शक्यता, तातडीने दुरूस्तीची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
अतिपावसाने अगसगे-बोडकेनहट्टी रस्त्यावरील जागो-जागी भरावाच वाहून गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधका खात्याचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी, लागत आहेत. जोरदा पावसाने रस्त्यावर पाणी येऊन ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अद्याप संबंधितांचे रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांतून नाराजी क्यक्त होत आहे.
जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने जागो-जागी रस्त्याशेजारील भरावा वाहून गेला होता. शिवाय जागो-जागी खड्डे पडले आहे. रस्त्यावरून ये-जा करणे कसरतीचे बनले आहे. गेल्या चार महिन्यापासून या वाहून गेलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून हंदिगनूर परिसरातील अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी यासह चंदगड तालुक्मयातील किटवाड, कुदनूर, दुंडगे, राजगोळी आदी भागातील वाहनधारकांची वर्दळ अधिक असते. शिवाय साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरूवात झाल्याने राजगोळी साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱया अवजड वाहनांची संख्या अधिक प्रमाणात आहे. मात्र जागो-जागी रस्त्याशेजारील भरावा वाहून गेल्याने रात्रीच्या अंधारात दुर्घटना घडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी होत आहे.