शॉर्ट सर्किटने आगीचा संशय
प्रतिनिधी / बेळगाव
शाहूनगर-बी. के. कंग्राळी जवळ असलेल्या एका अगरबत्ती कारखान्याला आग लागली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या घटनेत सुमारे साडेचार लाख रुपयांहुन अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
तिसऱया मजल्यावर अगरबत्ती तयार करण्यात येते. रविवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने आग लागली. घटनेची माहिती समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. व्ही. एस. टक्केकर यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
तिसऱया मजल्यावरील इमारतीत पुनीत के. आर. (वय 28) हा तरुण अडकला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला सुखरुप बाहेर काढले आहेत. स्फुर्ती हरबल अगरबत्ती तयार करणाऱया कारखान्यात आगीची ही घटना घडली असून आग विझविण्यासाठी व्ही. एस. टक्केकर, सी. डी. माने, किरण पाटील, रसुल काखंडकी, शरीफ नदाफ, ए. एम. जिनबसप्पण्णावर आदींनी प्रयत्न केले.









