वार्ताहर /ताम्हाने :
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार अखेर तालुका शिक्षण विभागाने संगमेश्वर तालुक्यातील लोवले मराठी शाळा नंबर 1 च्या प्रवेशद्वारावरील नाव शनिवारी हटवले.
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती वा बांधकामाला कुणाही खासगी व्यक्तीचे नाव देता येत नाही. असे असतानाही माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी स्वखर्चाने बांधलेल्या प्रवेशद्वाराला वडिलांचे नाव दिले होते. या विरोधात स्थानिकांनी पंचायत समितीकडे धाव घेतली होती. दोन महिने हा विषय गाजत होता. यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुका शिक्षण विभागाला हे नाव हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी कार्यवाही करण्यात आली. सद्यस्थितीत नावावर कापड चिकटवण्यात आले आहे. मात्र हे नाव पूर्णतः हटवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे….









