प्रतिनिधी/ रत्नागिरी
विलिनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असतानाच अखेर सव्वा महिन्यानंतर रत्नागिरी आगारातून लांजा व पावस अशा 2 गाडय़ा सोडण्यात प्रशासनाला यश आल़े आता जिह्याच्या सर्व आगारामधून बसफेऱया सुरू झाल्या आहेत़ शनिवारी दिवसभरात एकूण 300 हून अधिक फेऱया सोडण्यात आल्याचे एसटी रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आल़े
यामध्ये दापोली आगारातून 90 फेऱया, खेड-25, चिपळूण-40, गुहागर-2, देवरूख-74, रत्नागिरी-4, लांजा-24, राजापूर-42, मंडणगड-2 अशा एकूण 303 फेऱया जिह्यातील विविध आगारातून सोडण्यात आल्य़ा तर प्रवाशांचाही एसटीच्या फेऱयांना चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले आह़े दिवसभरात 3 हजार 119 जणांनी एसटीचा प्रवास केल्याची आकडेवारी समोर आल़ी
रत्नागिरी शहर बससेवा अद्याप बंदच
जिह्याच्या सर्व आगारातून एसटी बस सुटत असल्या तरी रत्नागिरी शहर बससेवा अद्याप बंदच ठेवण्यात आली आह़े दरम्यान शनिवारी 500 हून अधिक कर्मचारी कामावर हजर असल्याचे दिसून आल़े विलिनीकरणाच्या मुद्यावरील संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱयांबरोबर अधिकारीवर्ग वाटाघाटी करत आहेत़ सव्वा महिना बंद असलेल्या रत्नागिरी आगारातून अखेर बस सोडण्यात अधिकाऱयांना यश आल़े









