ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली.

अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्याकडे होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.








