सातारा : रविवारी (दि.13) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माहुली येथील पुलावरून एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने पुलाखालील डबक्यात मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, मृतदेह आढळून आला नव्हता.
आज सकाळी याच पुलाखालील डबक्यात एक मृतदेह फुगलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून, मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.









