146 जणांना वाचविण्यात यश
ऑनलाईन टीम / मुंबई :
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर दोन जहाजे अडकली होती. त्यामधील ‘हीरा ऑईल फील्ड्स’जवळ अडकलेले ‘पी-305’ नावाचे जहाज आज बुडाले. या जहाजात 276 लोक होते. त्यामधील 146 जणांना वाचवण्यात यश आले असून, 130 जण अजूनही बेपत्ता आहेत. या लोकांना वाचविण्यासाठी नौदलाची कोची आणि तलवार येथील टीम कार्यरत आहे.
तर दुसरे अडकलेले जहाज मुंबईपासून आठ नॉटिकल मैल अंतरावर आहे. या जहाजावर 137 जण असून, आतापर्यंत 38 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या जहाजावरील लोकांना वाचविण्यासाठी आयएनएस कोलकात्याची टीम कार्यरत असल्याची माहिती भारतीय नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी दिली.