उचगांव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथील एका खासगी भिशी चालवणाऱ्या महिलेने भिशीची रक्कम घेऊन पोबारा केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा सुरेश बोरकर (मूळगाव कोते, ता.राधानगरी) असे तिचे नाव असून सात लाख 14 हजारांची फसवणूक तिने केली आहे. माधवी संजय बागडे, जयश्री आप्पासाहेब शेळके, कविता अभिजीत पावले, शितल शंकर कवठेकर, अर्चना सतीश शेळके, काजल शिवराम ठाकूर, श्रद्धा गायकवाड, मंजुळा देवेंद्र अमृसकर, मोहिनी मिलिंद साखरे, अर्चना रणजित देसाई, शुभांगी विलास मोहिते, गीता बापू हुल्ले अशा फसगत झालेल्या बारा महिलांची नावे आहेत.
दैनिक तरुण भारतच्या वृत्ताच्या दणक्यामुळे व फसगत झालेल्या महिलांच्या पाठपुराव्यामुळे बहुचर्चित या प्रकरणाबद्दल गांधीनगर पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला. या प्रकरणी फसगत झालेल्या आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता संबंधित महिलांकडून व्यक्त होत आहे. ही रक्कम सुमारे 40 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गांधीनगरमधील कोयना काँलनीत सुरेखा सुरेश बोरकर (वय 62, मुळगाव रा.कोते, ता .राधानगरी) ही किराणा मालाचे दुकान चालवत होती. त्यातून अनेक महिलांची तिच्याबरोबर ओळख झाली. या दुकानांमध्ये महिलांची गर्दी वाढू लागली. त्यातून संबंधित महिलेने भिशी चालू केली. पण गेली 2 वर्षे झाली भिशीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून ही महिला गायब आहे. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच महीलांनी फिर्याद नोंदवण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाणे गाठले.
त्यामध्ये सुमारे तीनशे महिला सभासद असल्याची माहीती पोलिस ठाण्यात जमलेल्या महिलांकडुन समजली. संपूर्ण वर्षाची काबाडकष्ट करून जमा केलेली पुंजी हडप झाल्याने फसगत झालेल्या भिशी सदस्य महिला आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत. संबंधित भिशी चालक महिलेने बचत गट चालवते असे सांगून महिलांकडून रक्कम जमा केली होती. पाच हजारापासून लाख दीड लाख रुपयांची रक्कम संबंधित भिशी चालक महिलेकडे महिलांनी जमा केली होती. 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा जरी सुरू असली तरी हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यता आहे. यावेळी जमलेल्या सर्व महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रुंची धारा लागल्या होत्या.
फसगत झालेल्या 12 महिलांच्या वतीने माधवी संजय बागडे (रा कोयना कॉलनी गांधिनगर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुरेखा बोरकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









