डीनचा कारभार दुरुन डोंगर साजरे, इमारत बांधण्याच्या दिल्या सुचना
प्रतिनिधी/ सातारा
अगोदरच साताऱयाच्या मेंडिकल कॉलेजच्या मंजूरीला सतराशे साठ विघ्ने त्यात जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते डीन डॉ. संजय गायकवाड यांच्यावर कामाचा खूप ताण असल्याने ते सतत हायपरटेन्शनमध्ये असतात. त्यामुळे केंद्राचे पथक येणार येणार अशा नुसत्याच वावडय़ा उठत होत्या. दोन दिवसांपूर्वी अचानक पथकाने भेट दिल्याने चांगलीच तारांबळ डिनची उडाली होती. केंद्रीय पथकाने मेडिकल कॉलेजला इमारत बांधण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
सातारचे मेडिकल कॉलेजच्या मंजूरीवेळी अनेकदा राजकारण झाले. श्रेयवादामुळे हे कॉलेज रखडले गेले. साताऱयात मंजूर झाल्यानंतर जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. परंतु लगेच सरकार बदलले. सरकार बदलल्यानंतर उपमुख्य अजित पवार यांनी साताऱयाच्या दौऱयावर पत्रकारांनी छेडल्यानंतर त्या प्रकरणात लक्ष घातले होते. मंत्री जयत पाटील यांनी जाता जाता जागेचा प्रश्न सोडवला. पाटबंधारे विभागाच्या 62 एकर जागेमध्ये हे महाविद्यालय उभे राहणार आहे. राज्य शासनाने महाविद्यालयासाठी 495 कोटी रुपये मंजूर केले. महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग भरण्यास परवानगी दिली आहे. महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी राज्य शासनाच्या सर्व परवानग्या दिल्या गेल्या आहेत. असे असताना केंद्राची कमिटी त्यावर निर्णय घेणार होती. त्याकरता लेटर ऑफ कमिशन मिळणे बाकी होते. गेल्या पाच दिवसांपुर्वी समितीने अचानक येवून भेट देवून पाहणी केली. महाविद्यालयाची इमारत लवकर उभी राहवी यासाठी त्यांनी संकेत दिली आहेत.
डीनचा कारभार साताऱयातून व्हावा
साताऱयाच्या मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. गायकवाड हे सांगलीहून कार्यभार पाहतात. त्यांच्याकडे अनेक मोठय़ा जबाबदाऱया असल्याने ते सतत तणावाखाली असतात. एक डॉक्टर असूनही सतत तणावाखाली काम करत असतील तर सातारच्या मेडिकल कॉलेजचे भवितव्य हे खराब होण्याऐवजी डीनची जबाबदारी साताऱयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यावरच सोपवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









