वृत्तसंस्था/ हैद्राबाद
बर्मिंगहॅम येथे येत्या बुधवारपासून सुरू होणाऱया अखिल इंग्लंड आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून स्पेनची ऑलिंपिक विजेती महिला बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिनने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
ब्रिटनमध्ये होणाऱया या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत मारिनला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले होते. गेल्या रविवारी मारिनने अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते. मात्र अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ही ऑलिंपिक पात्रतेची नसल्याचे सांगण्यात आले आहे. मारिनला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. मारिनच्या गैरहजेरीमुळे भारताच्या पी.व्ही. सिंधूला अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद मिळविण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे तेपैईची यांग देखील अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार नाही.









