ऑनलाईन टीम / तरुण भारत
उत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सध्या तुरुंगात असलेले आझम खान हे दोन्ही नेते निवडूण आले असुन यामुळे त्यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे सोपवला असुन आपल्या खासदारकीचा त्याग केला आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहाल मतदारसंघातून विजयी झाले. तर आझम खान हे रामपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले होते. तर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव यांनी बोलताना स्पष्ट केले होते कि, आता संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेशातील विधानपरिषद निवडणुकांवर केंद्रित करणार आहे.
विधानपरिषद निवडणूक हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. तसेच आम्हाला प्रशासनाशीही लढायचे आहे. असं ही अखिलेश यादव यांनी म्हटले होते अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे उत्तर प्रदेशात आता ते विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमकपणे काम करतील, असे संकेत मिळत आहेत.








