प्रतिनिधी/ म्हापसा
खोर्ली म्हापसा येथील नागरिक तथा म्हापसा येथील सर्वप्रथम असलेली अक्षर या अक्षर ऍडव्हटाईसींगचे मालक रमेश मिशाळ यांचे मंगळवार दि. 7 रोजी सायं. 4 वा. राहत्या घरी वृद्धापकालीन निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार दि. 8 जुलै रोजी सकाळी 10. 30 वा. खोर्ली शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दै. तरुण भारतचे ते म्हापशातील प्रमुख जाहिरात एजन्ट होते. तरुण भारतचे सल्लागार संस्थापक किरण ठाकूर यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. मिशाळ हे बोचनवासन अक्षर पुरुषोत्तम संस्था श्री स्वामी नारायण यांचे फोलोवर होते. शिवाय वैश्य अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे संस्थापक, म्हापसा बाजारचे संचालक होते. शिवाय त्यांनी अनेक पदे हाताळली होती. त्यांच्यामागे विवाहित पुत्र स्नुषा, 3 मुली असा परिवार आहे. त्यांच्यामागे पत्नी अनुपमा (सुधा), पुत्र योगेश स्नुषा, 2 मुली शिल्पा आशिश दुबळे, तृप्ती प्रशांत स्वार, अक्षत गजानन लोटलीकर असा परिवार आहे. तसेच भाऊ प्रदीप, जीवन (म्हापसा नगरसेवक) असा परिवार आहे. सारस्वत बँकेच्या कर्मचारी शिल्पा दुबळे यांचे ते वडील होत.









