ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीसाठी धावून आला आहे. अक्षय कुमार ने मुंबई पोलीस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये लिहितात की, अभिनेता अक्षय कुमार ने मुंबई पोलीस फाऊंडेशनला दोन कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदतीसाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपण केलेली मदत मुंबई पोलीसांच्या त्या महिला आणि पुरुषांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करेल, जे आपल्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आहेत.
याला उत्तर देताना अक्षय कुमारने कोरोनामुळे आपला जीव गमावलेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडुरकर आणि संदीप सुर्वे यांना श्रद्धांजली वाहिली तसेच अक्षयने यावेळी आपल्या चाहत्यांनाही पोलीस फाऊंडेशनला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या आधीही अक्षय ने पी एम केअर फंडात 25 कोटी आणि बीएमसीला 3 कोटींची मदत केली आहे.









