प्रतिनिधी / बांदा:
कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा जमावबंदी आदेश असतानाही बांदा येथे जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करून मनाई आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी बांदा सरपंच अक्रम खान यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर अन्य 25 ते 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात येणार अशी माहिती बांदा पोलिसांकडून देण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बांदा कट्टा कॉर्नर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचा भंग केल्याप्रकरणी तब्बल 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात अक्रम खान, महेश धुरी, मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, गुरुनाथ सावंत, जावेद खतीब,ज्ञानेश्वर सावंत, उमेश पेडणेकर, विकास केरकर, प्रमोद कामत, मधुकर देसाई, प्रविण देसाई यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती बांदा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
Previous Articleकाबूलमध्ये पुन्हा स्फोट
Next Article गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेत शिवसेना वाटा घेणारच









