प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील साफळे येथील संतोष मनोहर चेंडके वय २२ या तरुणानी राहत्या घरात आत्महत्या केली. आज सकाळी ११ वाजता त्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. संतोष हा अक्कलकोट येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष चेंडके हा अक्कलकोट येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करीत आपल्या आई व भावा सोबत गावातच वास्तव्यास होता. दि १६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास हिरगप्पा महादेव बंदीछोडे शेतात काम करत असताना मुलगा शैलेश यांने वडिलांना फोनद्वारे संतोष ने घरात गळफास घेऊन मयत झाल्याची माहिती दिली. त्यानंतर हिरगप्पा बंदीछोडे यांने घरी जाऊन पाहिले असता भाचा संतोष याने राहत्या घरात पत्र्याच्या शेडच्या अँगलला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन मृत झालेला दिसला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून अज्ञात कारणाने गळफास घेऊन संतोषने जीवनयात्रा संपवली आहे.
याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात हिरगप्पा बंदीछोडे यांनी माहिती दिली आहे. संतोषच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विपीन सुरवसे, अंगद गीते यांनी भेट देऊन काम पाहिले.
Previous Articleखरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे; जितेंद्र आव्हाडांचा भाजप नेत्यांच्या टीकेला उपरोधिक टोला
Next Article अभिनेता विकी कौशलची कोरोनावर यशस्वीरित्या मात!









