अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट येथे कोविड हेल्थ सेंटर सुरू व्हावे ही मागणी करण्यात आली असून लवकरच अक्कलकोट येथे कोविड हेल्थ सेंटर सुरू करणार अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सायंकाळी अक्कलकोट पंचायत समितीमध्ये कोरोना संदर्भात अक्कलकोट शहर – तालुक्याची आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,प्रांताधिकारी ज्योती पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी ,तहसीलदार अंजली मरोड, नगराध्यक्ष शोभा खेडगी, मुख्याधिकारी आशा राऊत, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव बेळळे, डीवायएसपी संतोष गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकानी कोरोना हे संकट नसून संधी आहे. स्वताची काळजी घ्या. मास्क वापरा, स्वच्छता राखा, ऐकमेकानां भेटताना अंतर ठेवा, साबणाने हात धुवा. परगावच्या लोकांची प्रशासनाला माहिती द्या. प्रशासनाला सहकार्य करा .प्रशासन हे गेले तीन महिने काम करत आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोनाला नक्कीच आपण हरवू शकतो. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवटी केले.
यावेळी माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, नगरसेवक सद्दाम शेरिकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, भारिप बहुजन महासंघाचे नेते संदीप मडिखांबे, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे, नगरसेवक बसवलिंग खेडगी, पोलीस निरीक्षक के पुजारी, पोलीस निरीक्षक विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा माया जाधव आदींसह सर्वच खात्यातील अधिकारी वर्ग, पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleनाशिकमध्ये स्वयंस्फूर्तीने प्रमुख बाजारपेठा ८ दिवस बंद
Next Article सातारा : मुखदर्शनासाठी देवस्थाने खुली करा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.