प्रतिनिधी / अक्कलकोट
कोरोना संकटामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना 5 जुलै 2020 रोजीचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साधेपणाचे साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, डॉ. प्रशांत प्रधान (ठाणे), नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे हे उपस्थित होते.
दरम्यान प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व डॉ.प्रशांत प्रधान यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानेवैद्य दाखविण्यात आला. त्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसाद गृहातील श्रींची आरती संपन्न झाली. विधिवत पुजा मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी व सोमनाथ कुलकर्णी यांनी केली.देश-विदेशात अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यंदाचा 33 वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आले.
सालाबादा प्रमाणे न्यासाच्यावतीने गेल्या सहा महिन्यापासून यंदाच्या 33 वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त 10 दिवसांच्या धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे कार्यक्रम रद्द करुन कोरोना विषाणुचा संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी साध्या पध्दतीने वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे डामडौल न करता श्रींची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण कार्यक्रम संपन्न झाला. न्यासाच्यावतीने गेल्या 20 वर्षापासून धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे 21 वे वर्ष होते.
दरम्यान न्यासाचे स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणुच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यापासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. येथे सेवा करणारे 300 सेवेकरी आहेत. जरी अन्नदानाचे कार्य थांबले असले तरी न्यासाच्या बायलॉज प्रमाणे, सामाजिक, आरोग्य विषयक, पर्यावरणपूरक, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण-संवर्धन, आपत्ती व्यवस्थापक मदतकार्य आदी उपक्रम चालु आहेत.
या कोरोनाला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधन सामुग्री स्वच्छतेसाठी लागणारे साधनसामुग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. गरजू, गरिब, निराधार व परप्रांतीयांना मोफत अन्नदान करीत आहे. कोरोना विषाणू संदर्भात न्यासाच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरु करुन चांगली व्यवस्था केली व त्याचप्रमाणे शहर व खेडेगवात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे. दि.15 मार्च पासून अन्नदान सेवा, तात्पुरती स्थगित असून महाप्रसाद गृह, यात्रीभुवन, यात्रीनिवास, निवासी व्यवस्था पुर्णपणे बंद आहे. हा कार्यक्रम कोवीड-19 च्या नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करण्यात आला.
Previous Articleचीनला आणखी एक धक्का; हिरो सायकलने रद्द केला 900 कोटींचा करार
Next Article धामणी खोऱ्यात कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण








