अक्कलकोट / प्रतिनिधी
सिध्देश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक तथा प्रगतीशील शेतकरी शिवकुमार कापसे यांचे चिरंजीव योगेश कापसे यांनी यूपीएससी परीक्षेत देशांत २४९ रँकने विजय संपादन केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लायन्स क्लब तसेच माध्यमिक शिक्षण श्री शहाजी हायस्कूल येथे पूर्ण झाले आहे. त्यानंतर इंजिीअरिंगमध्ये पदवी घेऊन त्यांनी UPSC ची तयारी दिल्ली येथे केली.
अक्कलकोट शहरातील तत्कालीन प्रसिद्ध आडत व्यापारी कै.कल्याणप्पा कापसे यांचा नातू तसेच कृषिनिष्ठ शेतकरी शिवकुमार कापसे यांचा चिरंजीव योगेश हा शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी म्हणून गणला गेला आहे. प्राथमिक शिक्षण लायन्स क्लब अक्कलकोट शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण दहावीत 91.30 टक्के गुण मिळवून शहाजी हायस्कूल, अक्कलकोट येथे पूर्ण केले. त्यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथून बारावी तर पुण्याच्या व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालात ई अँड टीसीचीपदवी मिळविली. त्यानंतर एका खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी केली.
स्वतःच्या मनाशी उच्च ध्येय बाळगलेल्या योगेशचे मन नोकरीत रमले नाही. त्यामुळे त्याने त्याचा राजीनामा दिला व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी चार वर्षांपूर्वी दिल्ली गाठली होती. दिवसरात्र प्रयत्न करीत राहिला आणि शेवटी चौथ्या प्रयत्नात आपले ध्येय साध्य केले.आपल्या अथक परिश्रमातून व कष्टाच्या जोरावर त्यांनी UPSC ची परीक्षा पास केली. योगेश कापसेच्यां या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








