ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या हजार पार झाली आहे. अकोल्यात रविवारी 22 नवे रुग्ण आढळून आले. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1007 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 14 दिवसात अकोल्यामध्ये 18 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बळींची एकूण संख्या 51 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या 22 रुग्ण हे शंकर नगर, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, सिंदखेड, देवी खदान, गाडगे नगर, शिवाजी नगर, नवाब पुरा, गायत्री नगर, खेडनगर, अकोट फैल, गुळजपुरा, वाडेगाव, तारफैल येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, सध्या जिल्ह्यातील एकूण 1007 रुग्णांपैकी 319 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 619 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील 7311 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील 7259 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1007 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर 6252 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.