ऑनलाईन टीम / अकोला :
अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात मागील चोवीस तासात 51 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1243 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 194 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 143 अहवाल निगेटिव्ह तर 51 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकही मृत्यूची नोंद झाली नाही. मागील काही दिवसात रुग्ण वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. 16 दिवसात 32 जणांनी आपला जीव गमावला होता. त्यात सोमवारी खंड पडला असून प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8811 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 8479 फेरतपासणीचे 134 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 198 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8762 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 7519 तर पॉझिटिव्ह अहवाल 1243 आहेत.