ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरोमणी अकाली दलानेही भाजपची 21 वर्षांची साथ सोडली आहे. शिवसेनेनंतर भाजपची अकाली दलासोबतचीही युती तुटणार आहे.
शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाची मागील 21 वर्षांपासून भाजपसोबत युती होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबतची युती अकाली दलाने तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीमध्ये अकाली दल नेहमीच भाजपसोबत निवडणूक लढवितो. मात्र, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपने अकाली दलावर दबाव टाकला होता. त्यामुळे या कायद्यावर भाजप जोपर्यंत भूमिका घेत नाही. तोपर्यंत आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका अकाली दलाने घेतली आहे. कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचे शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत सांगितले.









